
Multibager Stocks | भारतीय शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत नफा कमाई करायचा असेल तर गुंतवणूकदारांनी स्टॉक दीर्घ काळ होल्ड करणे महत्त्वाचे आहे. आज या लेखात आपण असाच एक स्टॉक पाहणार आहोत, ज्याने दीर्घकाळात आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे.
ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनी डियाजिओच्या मालकीच्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 16000 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी युनायटेड स्पिरिट्स स्टॉक 1.30 टक्के वाढीसह 1,070.95 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
जर तुम्ही 22 वर्षापुर्वी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये गुंतवणूक केली असती आणि आपले शेअर्स दीर्घकाळ होल्ड केले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16 लाख रुपये झाले असते. 22 वर्षांपूर्वी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1057.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,097.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 730.90 रुपये होती. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीने आपले उत्तर प्रदेश राज्यातील शाहजहानपूरमधील 200 वर्षे जुने युनिट बंद केल्याची बातमी आली आहे. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड ही कंपनी मॅक्डॉवेल, रॉयल चॅलेंज, सिग्नेचर, जॉनी वॉकर आणि ब्लॅक डॉग या ब्रँडच्या दारू बनवण्याचे काम करते.
मागील एका महिन्यात युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स फक्त 6 टक्क्यांनी वाढले आहे. तर मागील सहा महिन्यांत युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीने आपले.शाहजहानपूर युनिट बंद केल्यानंतर माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाने बहु-वर्षीय पुरवठा साखळी कार्यक्षमता कार्यक्रमाचा भाग म्हणून उत्तर प्रदेश राज्यातील मध उत्पादन शाहजहानपूर युनिट बंद केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.