10 May 2025 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

Multibagger Stocks | करोडपती करणारा मालामाल शेअर! स्टील स्ट्रिप्स व्हील्स शेअरने एक लाखावर दिला 1.12 कोटी रुपये परतावा, डिटेल्स वाचा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | स्टील स्ट्रिप्स व्हील्स या स्टील आणि अॅलॉय व्हील्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त तेजीत धावत होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीचे शेअर्स 1.92 टक्क्यांच्या घसरणीसह 243 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Steel Strips Wheels Share Price)

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,878.40 कोटी रुपये आहे. स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीने मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. 18 ऑगस्ट 2003 रोजी स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीचे शेअर्स 2.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 247.80 रुपये किमतीवर पोहचला आहे.

1 लाखावर दिला 1.12 कोटी परतावा :

30 जानेवारी 2023 रोजी स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीचे शेअर्स 126.20 रुपये या आपल्या वार्षिक नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यानंतर अवघ्या 6 महिन्यांत हा स्टॉक 104 टक्के वाढून 26 जुलै 2023 रोजी 258.10 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. मात्र यानंतर स्टॉकमध्ये नफावसुली सुरू झाली आणि स्टॉक 4-5 टक्के घसरला. स्टील स्ट्रिप्स व्हील ही कंपनी मुख्यतः स्टील आणि अलॉय व्हीलचे उत्पादन करते. आणि निर्यात बाजारात देखील कंपनीने आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे.

स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांच्या विभागात 50 टक्के मार्केट वाटा काबीज केला आहे. तर व्यावसायिक वाहन विभागात 53 टक्के मार्केट वाटा काबीज केला आहे. आणि ट्रॅक्टर विभागात कंपनीने 44 टक्के मार्केट वाटा काबीज केला आहे. ही कंपनी दुचाकी आणि तीनचाकी वाहन क्षेत्रात देखील व्यवसाय करते.

या क्षेत्रात कंपनीने एकूण 30 टक्के वाटा काबीज केला आहे. स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीने आपले उत्पादन धोरण उच्च मार्जिन अलॉय व्हील आणि निर्यातीला पूरक असेल बनवत आहे. स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनी जगात सर्वात कमी किमतीत अलॉय व्हील्स निर्माण करते, म्हणजेच कंपनीला मार्जिनमध्ये वाढ करण्यास भरपूर वाव आहे.

स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीची आपल्या विद्यमान OEM संबंधित अलॉय व्हील स्पेसमधली कंपनीची ऑर्डर बुक FY2026 पर्यंत पूर्ण भरलेली आहे. ही कंपनी अधिक संपादनाद्वारे आपल्या उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये एकूण कंपनीची चाक उत्पादन क्षमता 32 दशलक्षपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनी पुढील आर्थिक वर्षापासून अॅल्युमिनियम कास्टिंग आणि ईव्ही व्यवसायातून महसूल संकलित करण्यास सुरुवात करेल.

स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनी मोठ्या प्रमाणात आपल्या कर्जाची परतफेड करत आहे. ब्रोकरेज फर्म आशिका रिसर्च फर्मने उच्च मार्जिन उत्पादनांवरील फोकस, मजबूत ऑर्डर बुक, मजबूत ताळेबंद, यासर्व बाबींचा विचार करून स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 301 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment on 05 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या