
Multibagger Stocks | निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO स्टॉक मार्च 2023 मध्ये NSE SME इंडेक्सवर 99 रुपये प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE SME इमर्ज प्लॅटफॉर्मवर 3 प्रति इक्विटी शेअर प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
जर तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 125 टक्के वाढले असते. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी निर्माण अॅग्री जेनेटिक्स स्टॉक 1.51 टक्के वाढीसह 235 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
या कंपनीचा स्टॉक अल्पावधीत 99 रुपये या इश्यू किमतीच्या तुलनेत वाढून आता 235 रुपये किमतीवर पोहोचला आहे. निर्माण ऍग्री जेनेटिक्स IPO मार्च 2023 मध्ये 99 रुपये प्रति इक्विटी शेअर किमतीवर गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1200 शेअर्स जारी केले होते. म्हणजे गुंतवणुकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,18,800 रुपये जमा करावे लागले होते.
जर तुम्ही निर्माण अॅग्री जेनेटिक्स या SME कंपनीच्या IPO स्टॉकमध्ये पैसे लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 125 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले असते. ज्या शेअर धारकांनी या कंपनीच्या IPO मध्ये 118800 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3.90 लाख झाले असते.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.