 
						Multibagger Stocks | अमेरिकन शेअर बाजारातील सकारात्मक सुधारणा आणि परकीय गुंतवणुकीचा ओघ यामुळे भारतीय शेअर बाजार तेजीत वाढत आहेत. या काळात असे काही स्मॉल कॅप स्टॉक आहेत, ज्यानी अवघ्या 3 दिवसात लोकांना 32.90 ते 46.75 टक्के परतावा कमावून दिला आहे.
कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2600.09 कोटी रुपये
या कंपन्यांमध्ये न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट, हिंद रेक्टिफायर्स, माझ्दा यांसारख्या कंपन्यांचा समावेश होतो. Mazda कंपनीचे एकूण बाजार भांडवल 396.03 कोटी रुपये आहे. तर Hind Rectifier या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 512.35 कोटी रुपये आहे. Nucleus Software Exports कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2600.09 कोटी रुपये आहे.
मागील 3 दिवसांत न्यूक्लियस सॉफ्टवेअर शेअरने 46.75 टक्के परतावा दिला
मागील 3 दिवसांत न्यूक्लियस सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरधारकांना सर्वाधिक म्हणजेच 46.75 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर हिंद रेक्टिफायर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 35.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. mazda कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 32.90 टक्के परतावा कमावून दिला आहे.
शेअरची उचांक पातळी किंमत
आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी न्यूक्लियस सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 4.27 टक्के घसरणीसह 995.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची उचांक पातळी किंमत 1,068.25 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 351.35 रुपये होती. मागील 5 या कंपनीच्या शेअरमध्ये 48.79 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी
आज दिनांक 31 मे 2023 रोजी हिंद रेक्टिफायर्स कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के घसरणीसह 288.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 299.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 321.95 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 154.00 रुपये होती. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये 31.21 टक्के वाढ पाहायला मिळाली होती.
मागील एका वर्षात शेअरने 77.91 टक्के परतावा दिला
आज दिनांक 31 मे 2023 रोजी माझदा कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के घसरणीसह 986.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7.20 टक्क्यांच्या वाढीसह 981 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची उच्चांक आणि नीचांक पातळी किंमत अनुक्रमे 1,040.00 रुपये आणि 501.00 रुपये होती.
मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 77.91 टक्के वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		