7 October 2022 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apple iPhone 14 Plus | ॲपल आयफोन 14 प्लसची आज विक्री सुरू, किंमत आणि फीचर्ससह सर्व डिटेल्स चेक करा Numerology Horoscope | 08 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा Dry Brushing  | डेड स्किन काढून त्वचा बनवा चमकदार, घरीच करा ड्राय ब्रशिंग, या टिप्स फॉलो करा शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु Mutual Funds | टॉप 10 म्युच्युअल फंड योजना ज्या गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत, त्या फंडाच्या योजना आणि यादी सेव्ह करा Penny Stocks | गुंतवणूकदारांसाठी लाईफ चेंजर ठरला हा 2 रुपयाचा शेअर, 1 लाखावर तब्बल 7 कोटी परतावा, स्टॉकबद्दल जाणून घ्या
x

Multibagger Stocks | धमाकेदार स्टॉक, या शेअरने कमी कालावधीत 67 टक्के परतावा दिला, स्टॉक पुढे अजून तेजीत येणार

Multibagger stocks

Multibagger Stocks | आज आपण अश्या एका स्टॉक माहिती घेणार आहोत जो 81 रुपयेवर ट्रेड करत होता. पण आता तो 600 रुपयांवर पोहोचला आहे. आपण माहिती घेत आहोत GHCL कंपनीच्या स्टॉक बद्दल. GHCL कंपनीच्या शेअर्सनी या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी 2022 मध्ये 67% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञ जीएचसीएलच्या शेअर्सवर अतिशय सकारात्मक आहेत.

रासायनिक उद्योग आणि व्यापार :
GHCL कंपनी रासायनिक उद्योगाशी संबंधित मिड-कॅप कंपनी आहे. या मल्टीबॅगर कंपनीने मागील तिमाहीत जबरदस्त नफा कमावला आहे. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीने 339 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीला ८५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीच्या शेअर्सनी 2022 मध्ये आतापर्यंत 67% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञ जीएचसीएलच्या शेअर्स बद्दल सकारात्मक आहेत. मागील 28 महिन्यांपूर्वी कंपनीचे शेअर्स 81रुपयावर ट्रेड करत होते आता ते 600 रुपयेच्या वर गेले आहेत.

पुढील लक्ष 848 रुपयांचे :
एप्रिल-जून 2022 तिमाहीच्या फायदेशीर निकालानंतर, ब्रोकरेज फर्म आणि बाजारातील तज्ञ GHCL च्या शेअर्स खरेदीबाबत सकारात्मक आहेत. प्रसिद्ध ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्ससाठी सकारात्मक खरेदी रेटिंगसह 898 रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे. जीएचसीएलच्या शेअर्सचा हा आतापर्यंतचा 52 आठवड्याचा उच्चांक असेल. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की जागतिक आणि घरगुती सोडा अॅशच्या मागणी-पुरवठ्यात असमतोल आहे. याशिवाय, रशिया-युक्रेन संकटाने देशांतर्गत पुरवठा मर्यादित केला आहे आणि किंमत वाढ झाली आहे. GHCL ब्राउनफिल्ड आणि ग्रीनफिल्ड प्रकल्पांद्वारे आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे शेअर्सच्या ट्रेडिंग व्हॉल्यूम मध्ये वाढ होईल.

GHCL बद्दल सविस्तर :
कंपनीच्या शेअर्सनी मागील 28 महिन्यांत जबरदस्त परतावा दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 81 रुपयेवर ट्रेड करत होते. GHCL चे शेअर्स 1 ऑगस्ट 2022 रोजी NSE वर दिवसा अखेर 633 रुपयांवर बंद झाले. जर आपण 27 मार्च 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, आणि तुम्ही गुंतवणूक होल्ड करून कायम ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 7.81 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks GHCL share price return on 2 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(364)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x