
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात असे अनेक स्मॉलकॅप स्टॉक आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांचे खिसे पैशाने भरले आहेत. या कंपन्यांच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी गुंतवणूकीवर करोडपती बनवले आहे. अशीच एक कंपनी आहे, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड. या कंपनीचे बाजार भांडवल 205 कोटी रुपये आहे.
मागील साडेतीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. हजुर मल्टी प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.60 टक्क्यांच्या घसरणीसह 134.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.23 टक्के वाढीसह 140.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
15 मे 2020 रोजी हजुर मल्टी प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स 0.84 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या तीन वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 16,000 टक्के वाढली आहे. ज्या लोकांनी 3 वर्षापूर्वी हजुर मल्टी प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 16,000 टक्के वाढून 1.6 कोटी रुपये झाले आहेत. जर तुम्ही साडेतीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 63,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त झाले असते.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात हजुर मल्टी प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरची किंमत 85.17 टक्के वाढली आहे.
मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 53.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. हजुर मल्टी प्रोजेक्ट्स या स्मॉलकॅप कंपनीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यात गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.