
Multibagger Stocks | CL Educate कंपनीने बुधवारी आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विद्यमान शेअर धारकांना 1:1 प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली. कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर्स धारकांना प्रत्येक 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीएल एज्युकेट कंपनीचे शेअर्स 4 टक्के कमजोरीसह 154.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
कंपनीने दिलेले स्पष्टीकरण :
या कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स कंपनीच्या सिक्युरिटीज प्रीमियम खात्यातून वाटप केले जातील. बोनस शेअर इश्यूचा भाग म्हणून 13.76 कोटी रुपयांचे एकूण 2,75,34,156 शेअर वाटप करण्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. सीएल एज्युकेट ही एक मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी असून मागील तीन वर्षांत या शेअरने आपल्या शेअर धारकांना 332 टक्के रिटर्न कमावून दिले आहेत. मागील वर्षी या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदाराना 66 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे.
सीएल एज्युकेट लिमिटेड कंपनीच्या मते, 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 53 टक्के अधिक महसूल कमावला आहे. कंपनीच्या महसुलात दर वार्षिक दराने सकारात्मक वाढ होताना दिसून येत आहे. कंपनीचे एकूण सर्वसमावेशक उत्पन्न 177 टक्के वाढले असून कंपनीचा EBITDA मर्जीन 24 टक्के वार्षिक दराने वाढून 18.6 रुपये पर्यंत पोहचला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.