
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारात हजारो कंपन्या सूचीबद्ध आहेत. त्यात अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवुकदाराना अल्प मुदतीत उत्तम परतावा दिला आहे, अंक काही कंपन्या अश्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत करोडपती केले आहे. पण अश्या मल्टीबॅगर शोधणे आणि त्यात संयमाने गुंतवणूक करणे खूप कठीण काम आहे. टेंशन घेऊ नका, आम्ही तुमचे काम सोपे करणार आहोत. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका मल्टीबॅगर स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत ज्याने आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ह्या कंपनीचे नाव आहे, “IOL Chemical And pharmaceutical Limited“. या कंपनीने आपल्या पोजिशनल भागधारकांना करोडो रूपयेचा नफा कमावून दिला आहे. या कंपनीत अनेक दिग्गज गुंतवणूकदारानी गुंतवणूक केली आहे, त्यापैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे ‘आशिष कचोलिया’. चला तर मग जाणून घेऊ कंपनीच्या शेअर्सची कामगिरी थोडक्यात
IOL Chemical And pharmaceutical चा इतिहास :
मागील एका महिन्यात आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेला हा स्टॉक 1.50 टक्के घसरला आहे. 6 महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी ह्या स्टॉक मध्ये पैसे लावले होते, त्यांनी आतापर्यंत 15 टक्के पैसे रक्कम गमावली आहे. त्याचवेळी, 2022 चालू वर्षात आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किमती 25 टक्क्यांनी खाली पडली होती. एक वर्षभरापूर्वी हा स्टॉक 585 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक कमालीचा पडला असून किंमत 362 रुपयांवर आली आहे. म्हणजेच मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किमती 40 टक्के पडली आहे. या शेअरने मागील एका वर्षात अत्यंत खराब प्रदर्शन केले आहे. मात्र ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी ह्या स्टॉक वर पैसे लावले होते, ते लोक आता करोडपती झाले असतील, हे नक्की. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 650 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ज्या लोकांनी पाच वर्षापूर्वी या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती त्यांनी 650 टक्के नफा कमावला आहे. मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 1150 टक्के वाढ झाली होती.
1 लाख गुंतवणुकीवर मिळालेला परतावा :
जर तुम्ही एक महिन्यापूर्वी या स्टॉक मध्ये एक लाख रुपये लावले असते, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 98,500 रुपयांपर्यंत खाली आले असते. जर 6 महिन्यांपूर्वी तुम्ही ह्या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 85,000 रुपये झाले असते. पण ज्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर एक लाख गुंतवले,सध्याच्या बाजारभावानुसार त्यांना 7.50 लाख रुपये परतावा मिळाला असता. त्याचप्रमाणे, जर तूही 10 वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 12.50 लाख रुपये झाले असते. प्रसिद्ध गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांची IOL Chemical And pharmaceutical कंपनीत 1.97 टक्केची हिस्सेदारी आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.