
Multibagger Stocks | शेअर बाजारात जास्त मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्यांना ब्लूचिप कंपनी म्हणतात. ह्या कंपनीच्या शेअर ची किंमत आणि त्यांचा परतावा दोन्हीही आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक असतो. आज आपण या लेखात अश्याच एका ब्लूचीप कंपनीच्या शेअर्स ची माहिती घेणार आहोत. या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. ह्या कंपनीचे नाव आहे, मारुती सुझुकी (Maruti Suzuki India Ltd). या स्टॉकने मागील 19 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे1 लाख रुपयेवर 53 लाख रुपयांचा परतावा दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मारुती सुझुकी इंडियाचे शेअर्स 9,320.00 रुपये किमतीवर बंद झाले होते. 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी च्या शेअरची किंमत 173.35 रुपये प्रति शेअर होती. या कालावधीत मारुतीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 5,276.41 टक्केचा भरघोस नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 19 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 53.76 लाख रुपये झाले असते.
पाच वर्षांत 16.82 टक्के वाढ :
मागील 5 वर्षांत मारुतीच्या स्टॉकमध्ये 16.82 टक्के आणि 3 वर्षांत 35.45 टक्के वाढ झाली आहे. मागील 1 वर्षात या स्टॉकमध्ये 25.89.टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, वार्षिक दर वाढ आधारावर, 2022 या चालू वर्षात मारुतीचा स्टॉक 23.87 टक्के वधारला आहे. NSE निर्देशांकावर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी किंमत 9,451 रुपये ला स्पर्श केला होता. हा स्टॉक सध्या 6,536.55 रुपये या आपल्या नीचांक पातळी किमतीच्या 42.58 टक्के वरील किमतीवर ट्रेड करत आहे. मारुतीचा स्टॉक मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांसाठी “सिंपल मूव्हिंग अॅव्हरेजच्या” वरील पातळीवर ट्रेड करत आहे.
स्टॉक खरेदी करावे की नाही?
ब्रोकिंग फर्म एडलवाईस वेल्थ रिसर्चच्या तज्ञांनी मारुतीच्या स्टॉकची टार्गेट प्राईस 10332 रुपये जाहीर केली आहे, आणि खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. विश्लेषकाने स्टॉक अहवालात म्हटले आहे की “मारुतीने नुकताच लाँच केलेल्या दोन SUV मॉडेल्ससाठी दरमहा 40,000 पेक्षा अधिक युनिटची मागणी येईल अशी अपेक्षा करतो. पुढील 12 ते 18 महिन्यांत या वाहन उद्योगक्षेत्रातील दिग्गज स्टॉकमध्ये 200-300 अंकांची वाढ अपेक्षित आहे. EBITDA मार्जिन अंदाजे 12 टक्के च्या जवळ असू शकते.”
कंपनीबद्दल सविस्तर :
मारुती सुझुकी ही भारतातील ऑटो उद्योगा क्षेत्रातील एक आघाडीची लोकप्रिय कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 2,82,260.59 कोटी रुपये आहे. भारतातील काही टॉपच्या ऑटोमोबाईल वाहन उत्पादकांपैकी एक प्रसिद्ध मारुती सुझुकीचा वाहन बाजारातील हिस्सा 50 टक्के पेक्षा अधिक आहे. मारुती भारतातील ऑटोमोबाईल्सची सर्वोत मोठी उत्पादक कंपनी आहे. जपानी कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची मारुती सुझुकी कंपनीत 56 टक्के मालकी आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.