1 December 2022 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा Penny Stock | अपना सपना मणी मणी! या पेनी शेअरने 50 हजारावर 5 लाख परतावा दिला, अजून 35 टक्के वाढणार, नोट करा
x

Multibagger Stocks | असा धमाकेदार शेअर निवडा, फक्त 50 रुपयाचा स्टॉक, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 2 कोटी रुपये केले

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज आपण अश्या एक जबरदस्त शेअर बद्दल जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. ही कंपनी आहे, रासायन उद्योग करणारी पौषक लिमिटेड. ह्या कंपनीच्या ​​शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत इतकी प्रचंड वाढ झाली आहे की गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर करोडपती झाले आहेत. काही काळापूर्वी ह्या कंपनीचा शेअर 50 रुपयांवर ट्रेड करत होता. पण आता तो 9000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 20,000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

गुंतवणूकदारांना 120% लाभांश देण्याचे जाहीर :
रसायने बनवणाऱ्या ह्या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या शेअरहोल्डर आणि गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी पौषक लिमिटेड आहे. इतका जबरदस्त परतावा दिल्यानंतर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक सुखद धक्का देखील आहे. पौषक कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 120% लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख 1 ऑगस्ट 2022 असेल.

1 लाख गुंतवणुकीचे ​​2 कोटी झाले :
11 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, कंपनीने इतकी वाढ मिळवली आहे. 2 डिसेंबर 2011 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर कंपनीची नोंद झाली आणि आज पौषक लिमिटेडच्या शेअर्स मध्ये एक लाख गुंतवणुकीचे ​​2 कोटी झाले आहेत. 29 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 9797.95 रुपयांवर ट्रेड करत होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 20,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर तुम्ही 2 डिसेंबर 2011 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती होल्ड करून ठेवली असती तर त्याचे मूल्य आज 2.03 कोटी रुपये झाले असते.

गेल्या 5 वर्षात दिला 1200% परतावा :
पौषक कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 1251% परतावा मिळवून दिला आहे. 4 ऑगस्ट 2017 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 721.60 रुपये वर ट्रेड करत होते. 29 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 9797.95 रुपयांवर बंद झाले. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या तुम्हाला 13.57 लाख रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger stocks of Paushak share price return check details on 1 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(441)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x