
Multibagger Stockss| शेअर बाजारात सोमवारी साखर कंपनीच्या स्टॉक मध्ये कमालीची वाढ दिसून आली होती. सुरुवातीच्या काही तासात विक्रीचा जबरदस्त दबाव असूनही NSE वर रेणुका शुगर कंपनीचे शेअर्स 65.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. रेणुका शुगर कंपनीच्या शेअर्सममध्ये शानदार तेजी पाहायला मिळाली होती. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर या वाढी मागचे खरे कारण
शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदारांच्या मते येणाऱ्या पुढील काही काळात साखर कंपनीचे स्टॉक वर जातील. ज्या साखर कंपन्यांचा व्यवसाय निर्यातीवर अवलंबून आहे, त्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होऊ शकते. ऑक्टोबर 2021-सप्टेंबर 2022 या कालावधीत साखरेची निर्यात 57 टक्क्यांनी वाढली आहे. रुपयाच्या घसरणीनंतर निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळेच जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत साखर कंपन्यांच्या स्टॉक मध्ये तेजी पाहायला मिळाली होती.
रेणुका शुगर शेअर्सची कामगिरी :
GCL सिक्युरिटीजने आपल्या स्टॉक अहवालात म्हंटले आहे की, “श्री रेणुका शुगर आणि इतर साखर कंपन्याची निर्यात वाढली आहे, आणि याचाच परिणाम कंपनीच्या महसूलासोबत शेअर्स वरही दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण दिवसेंदिवस वाढ आहे, पण याचा फायदा साखर कंपन्यांना होताना दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रेणुका शुगर कंपनी अतिरिक्त नफा कमावेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. हेच कारण आहे की, रेणुका शुगर कंपनीचा शेअर्स तेजीत आला आहे.
पुढील लक्ष किंमत :
रेणुका शुगर कंपनीच्या शेअर्सचे चार्ट पॅटर्न पाहिल्यास आपणास कळेल की, हा स्टॉक अप्रतिम कामगिरी करत आहे. कंपनीचे शेअर्स पुढील काळात 75 ते 80 रुपये किमतीवर जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याच वेळी, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी 55 रुपयांचा स्टॉप लॉस लावून बिनधास्त गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. 2022 मध्ये या वर्षी कंपनीच्या शेअरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. रेणुका शुगर कंपनीचे शेअर्स 30 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 65 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 2022 मध्ये रेणुका शुगर कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 115 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.