
Multibagger Stocks| पुणेस्थित रियल इस्टेट कंपनीच्या शेअर्सने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांची अनेक पटींनी वाढवली आहे. गेल्या दोन वर्षात या शेअर्समध्ये तब्बल 1520 टक्के पाहायला मिळाली आहे. 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 18.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आज त्या शेअरची किंमत 264 रुपयेवर गेली आहे. आपण ज्या कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत त्याचे नाव आहे,”सूरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड”. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीची वाटचाल सविस्तर
कंपनीबद्दल थोडक्यात :
सूरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड कंपनीची स्थापना 2008 मध्ये झाली होती. सूरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड ही एक रिअल इस्टेट कंपनी असून ती प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या विकासात बांधकामात गुंतलेली आहे. त्याच्या व्यावसायिक पोर्टफोलिओ मध्ये मुख्यतः निवासी तसेच व्यावसायिक मालमत्तेचा विकास करणे, विक्री व विपणन करणे, त्याने विकसित केलेल्या मालमत्तेची देखभाल करणे, यांसारख्या कामाचा समावेश होतो.
या मल्टीबॅगर रियल्टी कंपनीचे शेअर्स आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 264 रुपये किमतीवर ट्रेड करत होते जी त्याची सार्वकालीन उच्चांकी किंमत आहे. स्टॉक कालच्या कलोजींग प्राईज 220 रुपयेच्या तुलनेत 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. या स्टॉकने वाढीच्या बाबतीत फ्रंटलाइन इंडेक्स S&P BSE सेन्सेक्सलाही मागे टाकले आहे, ज्यात मागील एका वर्षात 4.20 टक्के घसरण झाली आहे. सूरतवाला बिझनेस ग्रुपच्या शेअर मध्ये मागील एका वर्षात 450 टक्केची वाढ झाली आहे. या BSE ‘एम’ ग्रुपमधील कंपनीचे बाजार भांडवल 458 कोटी रुपये आहे. आणि सध्या हा स्टॉक 32 पॉइंट P/E वर ट्रेड करत आहे.
सुरतवाला बिझनेस ग्रुप BSE SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट करण्यात आला होता. आणि BSE SME प्लॅटफॉर्मवरून BSE आणि NSE च्या मेनबोर्डवर स्थलांतरित करण्यासाठी कंपनीने 4 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत भागधारकांचे पोस्टल मतदान सुरू केले होते. आणि त्यानुसार शेअर धारकांनी स्टॉक बीएसईमध्ये स्थलांतर करण्यास मंजुरी दिली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.