 
						Multibagger Stocks| सध्या आपण शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहू शकतो, आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगले स्टॉक कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आली आहे. कोविड-19 मुळे शेअर बाजारात न भुतो न भविष्यती अशी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र या काळातही गुंतवणूकदारांनी आपली खरेदी वाढवून जबरदस्त कमाई केली होती. कोविड-19 नंतर मार्केट मध्ये मजबूत वाढ दिसून आली आणि त्याकाळात ज्या गुंतवणूकदारांनी त्रिवेणी टर्बाइनमध्ये गुंतवणूक केली होती ते आज करोडपती झाले आहेत. कमालीची गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे तज्ञांनी ह्या स्मॉल कॅप कंपनीला ‘बाय’ रेटिंग दिली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीची कामगिरी कशी होती, ह्याची सविस्तर माहिती घेऊ.
त्रिवेणी टर्बाइनची कामगिरी :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर BSE निर्देशांकावर 1.19 टक्क्यांनी वाढून 234.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या आठडात आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 24 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर 50.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, आणि शेअर बाजार जबरदस्त पडला. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती पण त्रिवेणीच्या स्टॉकमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध वाढ होत होती. मागील अडीच वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 367.73 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. मागील 30 महिन्यांत या कंपनीच्या शेअरमधे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संपत्ती 5 पट अधिक वाढली आहे. त्याचवेळी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.67 लाख रुपये झाले असते.
तज्ञ काय म्हणतात :
आनंद राठी त्यांनी आपल्या स्टॉक अहवालात म्हंटले आहे की, “या कंपनीच्या सकारात्मक बुक ऑर्डरमुळे बाजारात कंपनीची स्थिती अतिशय मजबूत दिसून येत आहे. या कंपनीच्या चांगल्या आर्थिक स्थितीमुळे आणि वाढत्या व्यापारामुळे येणाऱ्या काळात शेअरची किंमत 285 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेअर बाजारातील तज्ञ आणि ब्रोकरेज फर्म ने या शेअरला ‘बाय’ रेटिंग दिली आहे.
मागील वर्षी स्टॉकची वाटचाल :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 28 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. त्याचवेळी चालू वर्ष 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 22.34 टक्क्यांची पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यात ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 15.30 टक्के वाढ दिसून आली होती. एक महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती,त्या गुंतवणूकदारानी आतापर्यंत 9.64 टक्के नफा कमावला आहे. या शेअर ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 248.20 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		