
Multibagger Stocks | शेअर बाजारात सध्या बोनस शेअर्स जाहीर करण्याची स्पर्धाच सुरू आहे, असे कंपन्या बोनस शेअर्स वितरीत करत आहेत. अशीच एक स्मॉल-कॅप कंपनी “वीरम सिक्युरिटीज लिमिटेड” कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. वीरम सिक्युरिटीज लिमिटेडच्या संचालक मंडळाने बैठकीत ठरल्यानुसार 15 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. बोनस शेअर ची बातमी येताच आज या कंपनीचा शेअर 5 टक्के अप्पर सर्किटवर गेला आणि याच वाढीसह 31.55 रुपये किमतीवर दिवसा अखेर बंद झाला. या शेअरने खूप कमी कालावधीत आपल्या भागधारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे.
कंपनीने केलेली घोषणा :
आम्ही आपल्या विद्यमान भागधारक कळवू इच्छितो की कंपनीने शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022 ही बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. या कंपनीने आज स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये बोनस शेअरचे प्रमाण 1:2 असेल असे जाहीर केले. याचा अर्थ असा की ज्या भागधारकांची नावे सध्या कंपनीच्या रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड मध्ये दिसत आहेत त्यांना ठरलेल्या दिवशी मोफत बोनस शेअर्स दिले जातील. म्हणजे प्रत्येक 2 शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत दिला जाईल.
बोनस शेअरची बातमी येताच वीरम सिक्युरिटीज लिमिटेडच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आणि शेअर 31.55 रुपये किमतीवर बंद झाला होता. आजची शेअरची क्लोजींग किंमत जो 30.05 रुपये किमतीच्या बंदच्या तुलनेत 4.99 टक्के जास्त आहे. 10 नोव्हेंबर 2017 रोजी स्टॉक 6.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यात मागील पाच वर्षांमध्ये कमालीची वाढ झाली असून शेअर सध्या सर्वकालीन उच्चांक किंमतीवर गेला आहे. या कालावधीत शेअरच्या माध्यमातून भागधारकांनी गुंतवणूक करून 405.61 टक्के मल्टीबॅगर नफा कमावला आहे. 6 नोव्हेंबर 2019 रोजी शेअर 3.29 रुपये वर पडला होता त्यात आता वाढ होऊन शेअर सध्याच्या किमतीपर्यंत वाढला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी 916.90 टक्के नफा कमावला आहे.
उच्चांकी आणि नीचांकी किंमत :
सध्या शेअरची किंमत त्याच्या 52-आठवड्याच्या उच्चांकी किंमत पातळीच्या 44.69 टक्के खाली ट्रेड करत आहे. सध्याची ट्रेडिंग किंमत ही 52 आठवड्याच्या नीचांकी किंमत पातळीच्या 146.48 टक्के पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या प्रमोटर्सकडे 53.42 टक्के शेअरहोल्डिंग होती. FII च्या गुंतवणूकीचा वाटा 0.50 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 46.08 टक्के होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.