13 December 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Multibagger Stocks | 1 लाखाची गुंतवणूक वाढून 23 लाख झाली, या स्टॉकने 2 वर्षात 2000 टक्के परतावा दिला

Multibagger stocks

Multibagger Stocks | मागील सहा महिन्यात भारतीय शेअर बाजाराने थोडी निराशाजनक कामगिरी केली आहे. शेअर बाजारात काही मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांच्यावर कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा परिणाम होत नाही, आणि ते आपल्या गुंतवणूकदारांना सतत सकारात्मक परतावा देत असतात. असाच एक स्टॉक आहे ज्यात आपण जर 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या 1 लाख गुंतवणुकीचा परतावा 1.76 लाख रुपये झाला असता. 22 मे 2020 रोजी ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली असती तर त्यांचा परतावा म्हणून 23 लाख रुपये मिळाले असते.

काही स्टॉक आहेत ज्यांनी निराशा केले नाही :
कोरोना आल्या पासून आता पर्यंत गेल्या दोन वर्षांत शेअर बाजारात बरेच मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. कोरोना आला, आणि भारत विरूध्द चीन एलएसी वाद नंतर रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले, आता परदेशी गुंतवणूकदारांचे एक्सिट ह्यामुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचे आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. परंतु या काळात असे काही स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांची निराशा केले नाही. अशा स्टॉकच्या यादीत राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड नावाचा एक स्टॉक आहे. गेल्या दोन वर्षांत, या स्टॉकने गुंतवणूकदारांना 2000% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. राजरतन ग्लोबल वायर लिमिटेडचा स्टॉक वर्षानुवर्षे आपल्या गुंतवणूकदारांना कसा परतावा मिळवून देत आहे ते जाणून घेऊया :

राजरतन ग्लोबल वायर लि.चा व्यापार :
कोरोना काळात जेव्हा देशात लॉकडाऊन सुरू होता तेव्हा 22 मे 2020 रोजी शेअर बाजारात हा स्टॉक फक्त 37.28 रुपये वर ट्रेड करत होता. 37.28 रुपये पासून सुरू होऊन आज या स्टॉकची किंमत 880 रुपये पर्यंत वाढली आहे. म्हणजेच, या दोन वर्षाच्या काळात या शेअरच्या किमतीत 2260.52% ची वाढ झालेली दिसून आली आहे. त्याच वेळी, गुंतवणुकीच्या दृष्टीने जर 2022 या पूर्ण वर्षाबद्दल विचार केला तर, कंपनीच्या शेअरची किंमत वर्षाच्या सुरुवातीला 413 रुपयां वर ट्रेड करत होती आणि किंमत आता 880 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 2022 वर्षाच्या कालावधीत 112.93% परतावा मिळवून दिला आहे. गुंतवणुकदारांसाठी मागील महिना ट्रेडिंगच्या दृष्टीने चांगला गेला आहे. या दरम्यान प्रति शेअर ची किंमत 285.35 रुपयांपर्यंत वधरलेली दिसली आहे.

एक लाखाच्या गुंतवणुकीवर परतावा किती?
एका महिन्यापूर्वी जर तुम्ही या स्टॉकवर विश्वास ठेवून 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.48 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर 1 लाखावर 1.76 लाख रुपये परतावा मिळाला असता. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारांनी 22 मे 2020 रोजी या स्टॉकवर पैसा लावला आहे, त्यांना p परतावा म्हणून आता 23 लाख रुपयांचा नफा झाला असेल. कंपनीची 52 आठवड्यांची उचांक पातळी 896 रुपये होती आणि 52 आठवड्याची नीचांक पातळी 350.42 रुपये पर्यंत गेली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Rajaratan Global Wire Share Price in focus check here on 25 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x