
Multibagger Stock | वाडीलाल इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 1026 रुपयांवरून 2112.20 रुपयांपर्यंत पोहोचली होती. वडीलाल इंडस्ट्रीज कंपनी 115 वर्षे जुनी आहे.
आधी कोविड-19 नंतर रशिया आणि युक्रेन युद्धामुळे, जागतिक अस्थिरतेमुळे सध्या शेअर बाजाराची स्थिती खूप वाईट आहे. पण काही शेअर्सनी या कठीण काळात पण चांगली कामगिरी करून दाखवली आहे.गुंतवणूकदारांनी चांगले पैसे कमावले. या यादीत वाडीलाल इंडस्ट्रीजच्या शेअर्सचाही समावेश आहे. या लघु भांडवल कंपनीच्या शेअर्सने गेल्या वर्षभरात चांगला परतावा दिला. मागील 6 महिन्यांच्या किमतीचे निरीक्षण केले तर एका शेअरची किंमत 880 रुपयांवरून वाढून 2112.20 रुपये झालेली दिसेल. कंपनीची स्थापना 115 वर्षापूर्वी झाली होती.
वाडीलाल इंडस्ट्रीजची कामगिरी :
गेल्या 3 वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या शेअरची किंमत 493 रुपयांवर ट्रेड करत होती पण आता ती वाढून 2112.20 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 328.39% ची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या एक वर्षात कंपनीच्या शेअरची किंमत 1026 रुपयांवरून 2112.20 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या काळात शेअरच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. 18 जुलै 2022 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचली होती. त्याच वेळी, 25 जानेवारी 2022 रोजी, हा स्टॉक 823.80 रुपयांच्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किमतीवर व्यवहार करत होता. तेव्हापासून, वाडीलाल इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 156.64% वाढ पाहायला मिळत आहे.
1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर परतावा :
6 महिन्यांपूर्वी जर तुम्ही या शेअर्स मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचा परतावा म्हणून तुम्हाला 2.40 लाख रुपये भेटले असते. त्याचवेळी, वर्षभरापूर्वी जर वाडीलाल इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर 1 लाख रुपयांचा परतावा आता 2.05 लाख रुपयांवर पोहोचला असता. या कंपनीची स्थापना 1907 साली झाली होती. वाडीलाल इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 1518.50 कोटी आहे.
कंपनीच्या व्यापाराची सविस्तर माहिती :
वाडीलाल कंपनी आईस्क्रीम, फ्रोझन डेझर्ट, प्रक्रिया केलेले अन्न आणि इतर दुग्धजन्य पदार्थ बनवते आणि त्याची विक्री करते. सध्या कंपनीचा व्यापार 45 देशांमध्ये पसरला आहे. दक्षिण अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशामध्ये वाडीलाल कंपनीने आपल्या व्यापार वाढवला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.