
My EPF Pension Money | जर तुम्हीही नोकरी करत असाल आणि तुमचा ईपीएफ पगारातून कापला गेला असेल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. ईपीएस अंतर्गत किमान महिन्याच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. आता ताजी अपडेट अशी की, ‘ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती’ने कामगार मंत्रालयाला किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयांवरून साडेसात हजार रुपये करण्याची १५ दिवसांची नोटीस दिली आहे.
देशव्यापी आंदोलनाचा इशारा
ही मागणी मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असे समितीने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे. कर्मचारी पेन्शन योजना-१९९५ अर्थात.EPS-९५ ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) संचालित सेवानिवृत्ती निधी संस्था आहे. याअंतर्गत सहा कोटींहून अधिक ग्राहक आणि ७५ लाख पेन्शनधारक लाभार्थी आहेत.
पेन्शनरांच्या वैद्यकीय सुविधाही मर्यादित आहेत
केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात संघर्ष समितीने म्हटले आहे की, ईपीएस-९५ पेन्शनधारकांची पेन्शनची रक्कम अत्यंत कमी आहे. याशिवाय वैद्यकीय सुविधाही मर्यादित आहेत. त्यामुळे पेन्शनधारकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या पेन्शनच्या रकमेत १५ दिवसांत वाढ जाहीर न झाल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असेही या पत्रात म्हटले आहे. याअंतर्गत रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद करून सामूहिक उपोषणासारखी पावले उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नियमित अंतराने जाहीर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यासह किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी समितीने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ४ ऑक्टोबर २०१६ आणि ४ नोव्हेंबर २०२२ च्या निकालांनुसार प्रत्यक्ष वेतनावर पेन्शन देण्याची मागणीही समितीने केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.