
Naapbooks Share Price | शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी नॅपबुक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 69.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील बरेच दिवस स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता, मात्र शुक्रवारी या कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात खळबळ उडवून दिली. पडझडीच्या वातावरणात या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर क्लोज झाले होते. नॅपबुक्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर लागले कारण, कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली ज्यावर स्टॉकने सकारात्मक प्रतिसाद दिला. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Naapbooks Share Price | Naapbooks Stock Price | BSE 543351)
कंपनीची घोषणा आणि त्यावर प्रतिसाद :
नॅपबुक्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 7 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी भांडवल उभारणीच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. याचा अर्थ कंपनी भांडवल उभारणीसाठी राईट इश्यू जारी करु शकते. राइट्स इश्यूच्या माध्यमातून कंपनी भांडवल उभारणी करणार आणि त्याचा वापर व्यापार विस्तारासाठी करणार आहे. म्हणून काल स्टॉकमध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता.
शेअरची वाटचाल :
शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी नॅपबुक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 20 टक्के वाढीसह 69.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या व्यवहारादरम्यान शेअरची ओपनिंग 51 रुपयांवर झाली होती, आणि दिवसाअखेर शेअर 69.5 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 90 रुपये होती.
स्टॉकची कामगिरी : ठराविक कालावधीत दिलेला परतावा
* 1 महिना : 39.20 टक्के
* 6 महिने : 24.29 टक्के
* 1 वर्ष : 20,00 टक्के
* 3 फेब्रुवारी 2023 रोजी : 20 टक्के
नॅपबुक्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या IPO मध्ये कंपनीने एका लॉटमध्ये 1600 शेअर्स जारी केले होते. तर शेअरची इश्यू किंमत 71 रुपये ते 74 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. या कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स जारी करून 3.99 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष निर्धारित केले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.