
Natco Pharma Share Price | ‘नॅटको फार्मा’ या हैदराबादस्थित फार्मा कंपनीने मागील आठवड्यात शुक्रवारी बायबॅकची घोषणा केली होती. कंपनी 210 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स बायबॅक करणार आहे. या बायबॅकसाठी कंपनीने कमाल 700 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. गुरूवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 567.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
गुंतवणूकीवर 23 टक्के नफा :
बुधवारच्या शेअरच्या किमतीच्या आधारे ‘नॅटको फार्मा’ कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारखेपर्यंत धारण करणाऱ्या लोकांना बायबॅकच्या माध्यमातून 23 टक्क्यांहून अधिक नफा मिळेल. या बायबॅकद्वारे कंपनीने 30 लाख शेअर्स विकत घेण्याची योजना आखली आहे. हे शेअरचे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.64 टक्के आहे.
कंपनीची कामगिरी :
मागील एका महिन्यात ‘नॅटको फार्मा’ या फार्मा कंपनीच्या शेअरची किंमत 7.09 टक्के वाढली आहे. 2023 हे वर्ष आतापर्यंत गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त फायदा मिळवून देणारे ठरले आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक स्थिर वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी हे शेअर्स खरेदी केले होते, ते सध्या तोट्यात आहेत. नॅटको फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये मागील सहा महिन्यात सहा टक्क्यांहून अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 919.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 502 रुपये प्रति शेअर होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.