
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला (NSE: NBCC) मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 75 कोटी रुपये मूल्याची नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे. 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.91 टक्क्यांच्या घसरणीसह 169.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 30,429 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 209.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.71 रुपये होती. शुक्रवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 5.27 टक्के वाढीसह 178 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कंपनीचा नवीन करार
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने नागपूर येथे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकाम आणि विकासासाठी एनबीसीसी इंडिया कंपनीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. ही कंपनी पायाभूत सुविधांशी संबंधित कामे अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम मोडमध्ये पूर्ण करणार आहे. एनबीसीसी इंडिया कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी HSCC इंडिया लिमिटेड ने दरभंगा येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून 1260 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळवली आहे.
कंपनीच्या निव्वळ नफ्यात 38% वाढ
जून 2024 तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 38 टक्के वाढ झाली होती. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत एनबीसीसी इंडिया कंपनीचा निव्वळ नफा 77.41 कोटी रुपयेवरून वाढून 107.19 कोटी रुपये नोंदवला गेला होता. एप्रिल-जून 2024 तिमाहीत या कंपनीचे एकूण महसूल उत्पन्न वाढून 2197.83 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1974.03 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मागील 4 वर्षांत 591% परतावा दिला
मागील एका महिन्यात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकची किंमत 47 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 107 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने लोकांना 195 टक्के नफा दिला आहे. मागील 4 वर्षांत एनबीसीसी इंडिया स्टॉक 591 टक्के वाढला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.