
NBCC Share Price | गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाल्याचं (NSE: NBCC) पाहायला मिळालं. गेल्या तीन दिवसात जी तेजी दिसून आली होती, त्यात ब्रेक लागल्याचं दिसतंय. गुरुवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी (Gift Nifty Live) घसरला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी एनबीसीसी इंडिया शेअर 3.99 टक्के वाढून 99.50 रुपयांवर पोहोचला होता. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 26,865 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आठवडाभरात एनबीसीसी शेअर १२ टक्क्यांनी वधारला आहे.
कंपनीला दोन नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘कंपनीला दोन नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. कंपनीला ओडिशा सरकारकडून वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. ओडिशा सरकारकडून मिळालेला कॉन्ट्रॅक्ट ३१६ कोटी रुपयांचा आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये ओडिशा राज्यातील विविध ठिकाणी प्राथमिक शाळांच्या वसतिगृहांच्या अद्ययावतीकरणाचा समावेश आहे.
600 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने हुडकोसोबत सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी नोएडातील सेक्टर ६२ मधील १० एकर संस्थात्मक भूखंडाच्या विकासासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करणार आहे. या कॉन्ट्रॅक्टची किंमत सुमारे ६०० कोटी रुपये आहे.
गुंतवणूकदारांना 2253% परतावा दिला
मागील ५ दिवसात एनबीसीसी शेअरने 11.39% परतावा दिला. मागील १ महिन्यात या शेअरने 6.25% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 7.14% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात एनबीसीसी शेअरने 118.71% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनबीसीसी शेअरने 82% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 284.51% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 2,253.55% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.