
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह 143.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 25790 कोटी रुपये आहे.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 176.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 30.95 रुपये होती. आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के घसरणीसह 139.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 49 रुपयेवरून 192 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात NBCC इंडिया कंपनीच्या शेअर्सने 33 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून गुंतवणुकदारांना 332 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीने आपल्या एका निवेदनात माहिती दिली की, कंपनीने मागील 9 महिन्यांत 10,000 कोटी रुपयेचा व्यवसाय केला आहे.
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक केपी महादेव स्वामी यांनी एका निवेदनात माहिती दिली की, NBCC इंडिया कंपनीने डिसेंबर तिमाहीत 6566 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर या तिमाहीत कंपनीने 361 कोटी रुपये PBT नोंदवला आहे. एनबीसीसी इंडिया कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 63 टक्क्यांनी वाढले आहे, तर कंपनीचा PAT 66 टक्क्यांनी वाढला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने आम्रपाली प्रोजेक्टमधून 1170 कोटी रुपयेची कमाई केली आहे.
नुकताच एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला दिल्लीमधील नौरोजी नगर आणि सरोजिनी नगरमध्ये पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी मिळाली आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने भारत-पाकिस्तान बॉर्डरवर फेन्सिंग घालण्याचे काम देखील केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच भारत-म्यानमार सीमेवर 1643 किलोमीटर लांबीची फेंसिंग घालण्याची घोषणा केली होती. या कामाची जबाबदारी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.