
NBCC Share Price | NBCC इंडिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. गुरुवारी NBCC इंडिया स्टॉक 13 टक्के वाढीसह 63.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
मागील 1 महिन्यात 30 टक्के परतावा दिला
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. अवघ्या एका महिन्यात NBCC इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी NBCC इंडिया कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 60.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कंपनीला 180 कोटीची ऑर्डर मिळाली
NBCC इंडिया कंपनीचे शेअर्स गुरूवारी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात जाहीर केले की, कंपनीला 180 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. SAIL Limited कंपनीने NBCC इंडिया कंपनीला 180 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली आहे.
NBCC कंपनी SAIL कंपनीच्या आगामी इन्फ्रा संबंधित प्रकल्प, बोकारो स्टील लिमिटेड प्लांट, टाउनशिप, माइन्स आणि कॉलीरीजसाठी सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणून सेवा प्रदान करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
कंपनीला सातत्याने नवनवीन ऑर्डर मिळत आहेत
मागील काही महिन्यापासून एनबीसीसी कंपनीला सातत्याने नवनवीन ऑर्डर मिळत आहेत. याशिवाय NBCC इंडिया कंपनीने केंद्रीय पोलाद मंत्रालय आणि राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, नॅशनल लँड मॉनेटायझेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी मिळून बुधवारी सामंजस्य करार संपन्न केला आहे. मागील सहा महिन्यात NBCC इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 72.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात हा कंपनीच्या शेअरने 24.66 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.