
NBCC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 63.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते कारण, NBCC लिमिटेड कंपनीला केरळमधून 2,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 60.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ऑर्डर तपशील
NBCC लिमिटेड कंपनीने दिल्या माहितीनुसार कंपनीला केरळ राज्य गृहनिर्माण मंडळाने 2,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. NBCC कंपनीने मरीन ड्राइव्ह, कोची या ठिकाणी 17.9 एकर जमिनीचा विकास करण्यासाठी केरळ राज्य गृहनिर्माण मंडळासोबत MOU केला आहे. NBCC कंपनीने मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीन 8,754.44 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. NBCC लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 10,700 कोटी रुपये आहे.
कंपनीची कामगिरी
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 टक्के मजबूत झाले आहेत. मागील सहा महिन्यांत NBCC लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 65 टक्के वाढली आहे. 5 सप्टेंबर 2023 रोजी एनबीसीसी कंपनीचे शेअर्स 59.1 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 4 सप्टेंबर 2023 ला NBCC लिमिटेड कंपनीला मुंबईच्या परळच्या मिंट कॉलनीमध्ये ट्रान्झिट कॅम्प बांधण्याची ऑर्डर देखील मिळाली आहे.
यासोबत कंपनीला मिंट कॉम्प्लेक्समधील रहिवासी क्वार्टरच्या स्ट्रक्चरल आणि नॉन-स्ट्रक्चरल दुरुस्तीचे नियोजन, डिझाइन आणि अंमलबजावणी करण्याचे काम मिळाले आहे. यासह कंपनीला मुंबईतील कारखाना परिसरात नूतनीकरण करण्याचे काम देखील मिळाले आहे, ज्याचे एकूण मूल्य 20 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.