
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड या बांधकाम, सिंचन, खाणकाम आणि रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. एकेकाळी एक रुपयेपेक्षा स्वस्त असणाऱ्या एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आता आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते, एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरमधील तेजी अजूनही टिकून आहे. तज्ञांच्या मते सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक आणखी 31 टक्क्यांनी वाढू शकतो. आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर 0.82 टक्के वाढीसह 159.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
55000 चे झाले एक कोटी
22 वर्षांपूर्वी म्हणजेच 5 ऑक्टोबर 2001 रोजी ज्या गुंतवणूकदारांनी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 89 पैसे किमतीवर असताना 55000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आगा एक कोटी पेक्षा जास्त वाढली आहे. मागील वर्षी 17 ऑक्टोबर 2022 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 68.55 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 158 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 176.95 रुपये या आपल्या 15 वर्षांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते.
NCC मधील ट्रेंड
जून 2023 तिमाहीत एनसीसी लिमिटेड कंपनीने 31.89 टक्के वाढीसह 4380 कोटी रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता. याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 33 टक्क्यांच्या वाढीसह 409 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून 2023 तिमाहीत एनसीसी लिमिटेड कंपनीला 8154 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. कंपनीच्या ऑर्डरमध्ये वार्षिक आधारावर 83 टक्के अधिक वाढ झाली आहे. सध्या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 54110 कोटी रुपये आहे.
एनसीसी लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये सर्वात मोठी ऑर्डर म्हणजे, उत्तर प्रदेश जल जीवन जल प्रकल्पाची आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 16500 कोटी रुपये आहे. जुलै 2023 मध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीला 1919 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर्स मिळाले होते. कंपनीला विश्वास आहे की, यूपी जीवन जल प्रकल्प आणि इतर प्रकल्पांच्या आधारे या आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीच्या वार्षिक महसूल संकलनात 20 टक्के वाढ होऊ शकते.
ब्रोकरेज फर्म हेम सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, वाढत्या ऑर्डर आणि काम पूर्ण करण्याचा वेग वाढल्याने पुढील तिमाहीत एनसीसी लिमिटेड कंपनीचे आर्थिक निकाल मजबूत राखण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 213 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.