30 May 2023 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lumax Industries Share Price | मालामाल शेअर! लुमॅक्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 107 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला, प्लस 270 टक्के डिव्हीडंड Penny Stocks | पाच स्वस्त पेनी शेअर्स! एका महिन्यात पैसा गुणाकारात वाढतोय, स्टॉक लिस्ट पहा Redmi Note 12T Pro | 64 MP कॅमेरा आणि 144Hz डिस्प्ले, Xiaomi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स पहा Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे?
x

NDTV Share Price | अदाणींच्या ताब्यात जाताच NDTV चा नफा घटला, आता शेअर मंदीच्या छायेत जाणार?

NDTV Share Price

NDTV Share Price | अदानी समूहाने नुकताच एनडीटीव्ही मध्ये मोठी गुंतवणूक केली. गुंतवणूक अप्रत्यक्ष होती, मात्र एनडीटीव्ही कंपनी अदानी समूहाच्या जाळ्यात अलगद अडकली. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत अदानी समूह नियंत्रित एनडीटीव्ही कंपनीचा निव्वळ नफा 49.76 टक्क्यांनी घसरून 15.05 कोटी रुपयांवर आला आहे. एनडीटीव्हीने मंगळवारी स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला पाठवलेल्या तिमाही निकालात माहिती दिली आहे की, मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 29.96 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 216.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, New Delhi Television Share Price | New Delhi Television Stock Price | NDTV Share Price | NDTV Stock Price | BSE 532529 | NSE NDTV)

तिमाही निकाल तपशील :
एनडीटीव्ही या मीडिया कंपनीचा वाढलेल्या खर्चामुळे कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. परिचालन उत्पन्नही या तिमाहीत 9.44 टक्क्यांनी कमी झाले असून 105.37 कोटी रुपयेवर आले आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 116.36 कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीत एनडीटीव्ही कंपनीच्या खर्चात 4.93 टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीने एकूण 88.27 कोटी रुपये खर्च केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 84.12 कोटी रुपये होता.

शेअर्समध्ये पडझड :
एनडीटीव्हीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. कंपनीचे शेअर्स 227.70 रुपयांवर पोहचले होते. आज गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 216.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्यात एनडीटीव्ही कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता, आणि मागील एका महिन्यात स्टॉक 26.12 टक्के तुटला आहे. यावर्षी एनडीटीव्ही स्टॉक YTD आधारे 33 टक्के खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NDTV Share Price 532529 stock market live on 09 February 2023.

हॅशटॅग्स

#NDTV Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x