1 May 2025 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Netweb Technologies IPO | आला रे आला IPO आला! नेटवेब टेक्नोलॉजी IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, ग्रे मार्केट प्राईस पाहून फायदा घ्या

Netweb Technologies IPO

Netweb Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. काल सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नेटवेब टेक्नोलॉजीज कंपनीचा IPO ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी 94 टक्के सबस्क्राइब झाला आहे. (Netweb Technologies Share Price)

हा IPO बुधवार 19 जुलै 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. सबस्क्रिप्शनच्या पहिल्याच दिवशी कर्मचारी आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीच्या IPO मध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. यासह गैरसंस्थात्मक गुंतवणूकदार आणि पात्र संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून देखील नेटवेब टेक्नोलॉजी IPO ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

IPO अधिग्रहण प्रमाण :

नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1.38 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 3.79 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. NII चा राखीव कोटा 1.06 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर QIB राखीव कोटा 1 टक्के सबस्क्राईब झाला आहे. IPO डेटानुसार नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीला एका दिवसात 83,30,010 शेअर्सवर एकूण 88,58,630 शेअर्सची बोली आली होती. शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या 44,86,263 शेअर्सच्या तुलनेत 61,95,000 शेअरची बोली प्राप्त झाली होती.

नेटवेब टेक्नोलॉजी जीएमपी :

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते ग्रे मार्केटमध्ये नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 370 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. मात्र आधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेटवेब टेक्नोलॉजी IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 380 रुपयेवर ट्रेड करत होता. तो आता 10 रुपयांनी खाली आला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते हा IPO शेअर बाजारात धमाकेदार एंट्री करु शकतो. कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 475 ते 500 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. जर ही ग्रे मार्केट किंमत टिकुन राहिली तर गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशी 74 टक्के नफा मिळू शकतो. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स 870 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Netweb Technologies IPO today on 18 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Netweb Technologies IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या