
New Income Tax Slab | अर्थमंत्र्यांनी नव्या कर प्रणालीत पगारदार वर्गासाठी स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपयांवरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. याशिवाय नव्या व्यवस्थेत टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे.
परंतु जुन्या करप्रणालीत येणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. त्याऐवजी दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कर सध्याच्या 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के करण्यात आल्याने मध्यमवर्गाला धक्का बसणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन सध्याच्या 50,000 रुपयांवरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवले आहे.
नव्या कर प्रणालीचे नवे प्रस्तावित टॅक्स स्लॅब
नव्या कर प्रणालीअंतर्गत जाहीर करण्यात आलेले नवे टॅक्स स्लॅब खालीलप्रमाणे आहेत.
* 3,00,000 रुपयांपर्यंत – टॅक्स नाही
* 3 लाख ते 1 लाख ते 7 लाख – 5% टॅक्स
* 7 लाख रुपये 1 ते 10 लाख – 10% टॅक्स
* 10 लाख रुपये 1 ते 12 लाख – 15% टॅक्स
* 12 लाख ते 15 लाख – 20% टॅक्स
* 15 लाखांपेक्षा जास्त – 30% टॅक्स
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.