
NHPC Share Price | PSU एनएचपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी 0.23% वाढून 93.20 रुपयांवर बंद झाला होता. दरम्यान, या PSU शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. या सरकारी कंपनी (NSE: NHPC) स्टॉकच्या टेक्निकल चार्ट मोठ्या तेजीचे संकेत दिसत असल्याचे म्हटले आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
दरम्यान, जागतिक पातळीवरील नकारात्मक घडामोडींमुळे मागील काही दिवस PSU शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर काही निवडक शेअर बाजार तज्ज्ञांनी हा शेअर शॉर्ट टर्ममध्ये अजून घसरेल असे म्हटले होते. त्यामुळे तज्ज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 90 रुपयेच्या आसपास नफा वसुली करण्याचा सल्ला दिला होता. मात्र काही तज्ज्ञांनी याच PSU शेअरमध्ये तेजीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.62 टक्के घसरून 89.80 रुपयांवर ट्रेड करत आहे.
स्टॉक टार्गेट प्राईस
शेअर बाजार तज्ज्ञांनी हा PSU स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच त्यासाठी 80 रुपये प्राईसवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, हा PSU शेअर लॉन्ग टर्म मध्ये 120 रुपयांची लेव्हल स्पर्श करू शकतो. या PSU शेअरची 52 आठवड्याचा उच्चांक 118.40 रुपये असून 52 आठवड्याची निच्चांकी प्राईस 48.40 रुपये होती. आजच्या तारखेपर्यंत या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 93,590 कोटी रुपये आहे.
शेअरचा गुंतवणुकीवर परतावा
मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये PSU एनएचपीसी शेअर्समध्ये 1.79% तेजी पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षाचा विचार केल्यास या PSU शेअरने गुंतवणुकदारांना 80% परतावा दिला आहे. तर मागील दोन वर्षात या PSU शेअरने 166.68% टक्के इतका परतावा दिला आहे. मागील 3 वर्षात तोच परतावा 226% आणि 5 वर्षांत 332% आणि 10 वर्षात 397% इतका राहिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.