
NHPC Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मजबूत तेजीने सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ३५९ अंकांच्या वाढीसह ७६९७८ च्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 87 अंकांच्या तेजीसह 23290 च्या पातळीवर खुला झाला होता. दरम्यान, एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर बोलताना स्टॉक मार्केट तज्ञांनी पीएसयू एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी दिसून येत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तज्ज्ञांनी सल्ला देताना स्टॉपलॉस सह गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. तसेच मार्केट तज्ज्ञांनी एनएचपीसी कंपनी शेअरची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
एनएचपीसी कंपनी शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी म्हणाले की, ‘एनएचपीसी कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांनी लॉन्ग टर्म दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. 2023 ते 2024 च्या मध्यापर्यंत एनएचपीसी कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आता एनएचपीसी कंपनी शेअरचा साप्ताहिक चार्ट पाहिला तर तो १०० आठवड्यांच्या सरासरीची पुन्हा चाचणी घेत आहे. मागील आठवड्यात येथून पुनरागमन झाल्याचे दिसून आले आहे असं मार्केट तज्ज्ञ ध्वनी म्हणाले.
एनएचपीसी शेअर टार्गेट प्राईस
तज्ज्ञांनी एनएचपीसी कंपनी शेअरसाठी गुंतवणूकदारांना ६८ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिली आहे. एनएचपीसी शेअरमध्ये नव्याने ब्रेकआऊटची पातळी ८५ रुपयांवर तयार होत आहे. एनएचपीसी शेअरने ८५ रुपयांची पातळी ओलांडताच तो १०० ते १०५ रुपयांपर्यंतचे पोहोचू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.