
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्टवर गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुन्हा 115-118 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एनएचपीसी कंपनी अंश )
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 120 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत एनएचपीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 300 टक्के वाढवले आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.0100 टक्के घसरणीसह 100.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी एनएचपीसी स्टॉकमध्ये 115 ते 118 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 94 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील तीन महिन्यापासून एनएचपीसी स्टॉकमध्ये FIIs नी प्रॉफिट बुकींग सुरू केली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये FII ने एनएचपीसी कंपनीचे 7.59 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
डिसेंबर 2023 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 7.38 टक्केवर आले होते. तर मार्च 2024 मध्ये FII चा वाटा 6.8 टक्क्यांवर आला होता. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही या स्टॉकमध्ये भरघोस नफा वसुली केली आहे. डिसेंबर 2023 मध्ये एनएचपीसी DII ने या कंपनीचे 14.95 टक्के भाग भांडवल धारण केले होते. मार्च 2024 मध्ये तो त्यांचा वाटा कमी होऊन 12.59 टक्क्यांवर आला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.