
Nintec Systems Share Price | मागील एका वर्षात निनटेक सिस्टम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा फायदा देणार आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Nintec Share Price)
प्रत्येक 5 शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार
कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी निनटेक सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 646.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एका वर्षात दिला 129 टक्के परतावा
निनटेक सिस्टम्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 129.94 टक्के नफा कमावून दिला आहे. 21 जून 2022 रोजी निनटेक सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 45.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 जून 2023 रोजी हा स्टॉक 644.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. निनटेक सिस्टम्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 41 रुपये होती.
2023 या वर्षात आतापर्यंत निनटेक सिस्टम्स कंपनीच्या शेअरची किंमत 130 टक्के वाढली आहे. 2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 257.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 जून 2023 रोज निनटेक सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 644.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका महिन्यात निनटेक सिस्टम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. निनटेक सिस्टम्स ही तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. या कंपनीची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सोल्यूशन्समध्ये स्पेशलायझेशन आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.