 
						NMDC Share Price | भारतीय शेअर बाजार मागील आठवड्यात शुक्रवारी विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मागील आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीची (NSE: NMDC) घोषणा करताच भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरू झाली होती. फेडरल रिझर्व्हने आपल्या सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या बैठकीत व्याजदरात 50bps ची कपात केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अशा काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी तज्ज्ञांनी टॉप 3 लार्ज कॅप स्टॉक्सची निवड केली आहे. या तिन्ही शेअरमध्ये गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून देण्याची क्षमता आहे.
MOIL :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 40 टक्के वाढू शकतात. मँगनीज धातू आणि इतर मौल्यवान खनिजांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपनीच्या शेअर्स वर तज्ञांनी BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 84.1 टक्के वाढली होती. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 407.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
NMDC – BSE: 526371
शेअर बाजारातील जवळपास 17 तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही हिऱ्याची खाण चालवणारी आणि लोखंडाची सर्वात मोठी उत्पादक कंपनी मानली जाते.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 38 टक्के वाढू शकतात. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 11 टक्के वाढली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.84 टक्के वाढीसह 244.21 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
कोल इंडिया :
शेअर बाजारातील जवळपास 22 तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 77 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 5.1 टक्के वाढली होती. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के घसरणीसह 509.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		