2 May 2025 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी संदर्भात महत्वाची अपडेट आली आहे. एनटीपीसी ग्रीन कंपनीने शनिवारी स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘एनटीपीसी ग्रीन कंपनीने बिहार राज्य सरकारच्या उद्योग विभागासोबत राज्यात अक्षय ऊर्जा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकृत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर सध्या 131.70 रुपयांवर ट्रेड करतोय. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)

एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अपडेट्स

एनटीपीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने 20 डिसेंबर 2024 रोजी पाटणा येथे पार पडलेल्या “बिहार बिझनेस कनेक्ट 2024” ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट दरम्यान बिहार राज्य सरकारच्या उद्योग विभागासोबत सामंजस्य करारावर अधिकृत स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

बिहारचे राज्याचे उद्योगमंत्री नितीश मिश्रा आणि बिहार सरकारचे संचालक (उद्योग) आलोक रंजन घोष आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे अतिरिक्त जीएस (बिझनेस डेव्हलपमेंट) बिमल गोपालाचारी यांनी अधिकृत सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. या कराराचे मुख्य उद्दीष्ट बिहार राज्यात जमिनीवर स्थापित आणि तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प, बॅटरी ऊर्जा स्टोरेज प्रणाली आणि ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी उपक्रम विकसित करणे आहे.

एप्रिल 2022 मध्ये स्थापन झालेली एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी एनटीपीसी लिमिटेडची उपकंपनी आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये एनटीपीसी लिमिटेड कंपनीने या उपकंपनीला 15 नवीकरणीय ऊर्जा मालमत्ता हस्तांतरित केल्या होत्या. सप्टेंबर 2024 पर्यंत, ही कंपनी ऑपरेटिंग क्षमतेच्या बाबतीत देशात सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पीएसयू (हायड्रो वगळून) आहे. सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती हा एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा व्यवसाय आहे. देशभरातील 6 राज्यांमध्ये 3220 मेगावॅट सौर आणि 100 मेगावॅट पवन प्रकल्पांची ऑपरेशनल मालमत्ता आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी आयपीओसाठी 102-108 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली होता. या प्राईस बँडच्या तुलनेत एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर 111 रुपयांच्या किंमतीवर सूचीबद्ध झाला होता. बीएसईवर एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर ३.३३ टक्क्यांच्या प्रीमियमवर १११.६० वर बंद झाला होता. तर एनएसईवर 3.24% प्रीमियमवर म्हणजे 111.50 रुपयांच्या वर सूचीबद्ध झाला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price Saturday 21 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या