
NTPC Share Price | मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने ऊर्जा क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे कव्हरेज सुरू (NSE: NTPC) केले आहे. देशातील मजबूत होत चाललेल्या पॉवर थीमवरील तेजीचे हे लक्षण आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीला मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मकडून सकारात्मक रेटिंग देण्यात आली आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मला असा विश्वास आहे की देशांतर्गत ऊर्जा क्षेत्र तेजीने वाढणार आहे आणि या क्षेत्रासंबंधित कंपन्यांचे शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
एनटीपीसी शेअर प्राईस – ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग
मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 475 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मच्या मते एनटीपीसी शेअर गुंतवणूकदारांना २५ टक्के परतावा देऊ शकतो. ऊर्जा सुरक्षा आणि ट्रान्झिशन या दोन्ही थीमचा एनटीपीसी लिमिटेड कंपनीला फायदा होतो, असं देखील ब्रोकरेजने म्हटले आहे.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात एनटीपीसी लिमिटेड शेअर 10.60% घसरला आहे. मागील ६ महिन्यात शेअरने 2.19% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात एनटीपीसी लिमिटेड शेअरने 48.43% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनटीपीसी लिमिटेड शेअरने 218.24% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 20.56% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.