 
						NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील एबिटा वार्षिक आधारावर आठ टक्क्यांनी (NSE: NTPC) घसरला आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर काही तज्ज्ञांनी या शेअरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. एनटीपीसी ग्रुपने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ४८५ मेगावॅट व्यावसायिक RE क्षमतेची भर घातली आहे. त्यात ९० मेगावॅट एनटीपीसी लिमिटेड कंपनी आणि ३९५ मेगावॅट ग्रुपमधील कंपन्यांचा हिस्सा आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
MOFSL ब्रोकरेज फर्म रिपोर्ट
एनटीपीसी लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, ‘दुसऱ्या तिमाहीत एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा नफा 14 टक्क्यांनी वाढून 5,380 कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत 40,300 कोटी रुपयांचा स्वतंत्र महसूल 3 टक्क्यांवर आला आहे, जो MOFSL ब्रोकरेज फर्मच्या 41,700 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. तसेच कोळशाच्या सरासरी दरात घट झाल्याने हा दर प्रतिटन ३७९१ रुपयांवरून ३५८४ रुपयांवर पोहोचला आहे अशी माहिती एनटीपीसी लिमिटेड कंपनीने दिली आहे.
एनटीपीसी लिमिटेड कंपनीने एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड आयपीओ’सह आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक वर्ष २०३२ पर्यंत ६० गिगावॅट क्षमतेचे अक्षय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट गाठण्याचे उद्दिष्ट आहे, असे MOFSL ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
MOFSL ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
MOFSL ब्रोकरेज फर्मने सांगितले की, स्टॉकवर ‘न्यूट्रल’ रेटिंग आहे आणि लक्ष्य किंमत 450 रुपये आहे, जे पुढील काळात 12 टक्के संभाव्य तेजी दर्शविते.
नुवामा ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
नुवामा ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘एनटीपीसी पॉवर युटिलिटी स्पेसमध्ये ही कंपनी अव्वल आहे. 23 गिगावॅटपेक्षा अधिक क्षमता यामुळे कंपनी सकारात्मक फायदा देईल. नुवामा ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तसेच ४५८ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात 13.04% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 74.91% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 237.74% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 32.48% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		