
NTPC Share Price | गुरुवार 2 जानेवारीला शेअर बाजारात तुफान खरेदी पाहायला मिळाली होती. गुरुवारी सकाळी 9.35 वाजेपर्यंत बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक किरकोळ तेजीसह ट्रेड करत होते. दरम्यान, वीज क्षेत्रातील पीएसयू एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर सुद्धा तेजीत होता. आता इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
एनटीपीसी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.32 टक्क्यांनी वाढून 338.05 रुपयांवर पोहोचला होता. एनटीपीसी कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 448.45 रुपये होती, तर एनटीपीसी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 296.55 रुपये होती. एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,27,796 कोटी रुपये आहे.
एनटीपीसी शेअर टार्गेट प्राईस
इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने ‘BUY’ रेटिंग सह 421 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. यापूर्वी ब्रोकरेजने त 457 रुपये टार्गेट प्राईस दिली होती. एनटीपीसी शेअरमध्ये करेक्शन झाल्यानंतर आता या शेअरमध्ये चांगली संधी असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे.
एनटीपीसी कंपनीने बोनस शेअर्स दिले होते
बीएसईवर उपलब्ध माहितीनुसार, एनटीपीसी लिमिटेड कंपनीने आतापर्यंत एकदा बोनस शेअर्स वाटप केलं आहे. 2019 मध्ये एनटीपीसी लिमिटेड कंपनीने 1:5 या प्रमाणात बोनस शेतीस दिले होते.
एनटीपीसी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात एनटीपीसी कंपनी शेअर 0.10% घसरला आहे. मागील १ महिन्यात एनटीपीसी शेअर 5.63% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 8.73% घसरला आहे. मागील १ वर्षात एनटीपीसी शेअरने 10.47% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनटीपीसी शेअरने 183.24% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 436.93% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनटीपीसी शेअरने 1.44% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.