 
						Nykaa Share Price | सौंदर्य प्रसाधन ई-रिटेलर ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. हा स्टॉक कधी अचानक अप्पर सर्किट स्पर्श करतो, तर कधी लाल निशाणी वर घसरलेला असतो. या शेअर मध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 139 रुपयांवर ट्रेड करत होते. तर आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के घसरणीसह 131.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39,500 कोटी रुपये आहे. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
शेअरची कामगिरी :
‘नायका’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 315.86 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 120.50 रुपये होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 3 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाला होता. महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी शेअर बाजार बंद होता. त्यापूर्वी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स सलग नऊ दिवस घसरत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स’ ने ‘नायका’ कंपनीमधील आपले भाग भांडवल खुल्या बाजारात विकले होते. डीलर्सनी FII डेस्कवर स्टॉकची मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. असे असूनही भारतीय गुंतवणूकदारांचा ‘नायका’ कंपनीवरील विश्वास काही प्रमाणात वाढला आहे. मागील एका महिन्यात ‘नायका’ कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठा फेरबदल पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर नायका कंपनीच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा त्याग केला. तेव्हापासून ‘नायका’ कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
नायका कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. ‘नायका’ कंपनीने IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 1125 रुपये निश्चित केली होती. IPO Stock तब्बल 2000 रुपयांच्या पुढे सूचीबद्ध झाला होता. एका दिवसात या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		