2 May 2025 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Nykaa Share Price | मजबूत घसरलेल्या नायका शेअरवर 76 टक्के परतावा मिळू शकतो, स्टॉक अपडेट्स पहा

Nykaa Share Price

Nykaa Share Price | भारतातील प्रसिद्ध महिला उद्योजक ‘फाल्गुनी नायर’ यांनी स्थापन केलेल्या ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ म्हणजेच प्रसिद्ध ब्रँड ‘नायका’ कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच काळापासून सेलिंग प्रेशरला सामोरे जात आहेत. जागतिक नकारात्मक ट्रिगरमुळे आज भारतीय शेअर बाजार लाल निशाणीवर क्लोज झाला. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के घसरणीसह 140.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये ही कंपनीला तोटा सहन करावा लागला होता.

तज्ञांचे स्टॉकबाबत मत :
‘नायका’ कंपनी आपल्या व्यापार वाढीसाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करत आहे, परंतु BPC आणि फॅशन या दोन्ही विभागांसाठी एकूण मार्जिन कमी झाल्यामुळे मॅक्रो आणि डाउन ट्रेडिंगला जबर फटका बसला आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मचे तज्ञ म्हणतात की, फॅशन इंडस्ट्रीमधील मंद वाढ ही मागील बऱ्याच वर्षांपासून चिंतेची बाब बनली आहे. काही ब्रोकरेज फर्मने ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकची लक्ष किंमत कमी केली आहे. ‘नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ ने ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकवर 250 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच दीर्घ काळात हा स्टॉक 76 टक्के वाढ नोंदवू शकतो, असे तज्ञांना वाटते.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ‘नायका’ कंपनीच्या उत्पन्नात 33 टक्क्यांची वाढ झाली आणि, कंपनीने 1,462.82 कोटी रुपये कमाई केली होती. मागील वर्षी डिसेंबर 2021 तिमाहीत कंपनीने 1,098.3 कोटी रुपये कमावले होते. कंपनीच्या CEO फाल्गुनी नायर म्हणाल्या की, ‘नायका’ कंपनी सध्या EBITDA मार्जिनपूर्वी कंपनीचे उत्पन्न वाढवत आहे. मागील एका वर्षात ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 39.11 कमजोर झाले आहेत. तर मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 37.07 टक्के कमजोर झाले आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4.71 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price return on investment check details on 13 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या