
Nykaa Share Price | परकीय ब्रोकरेज हाऊस नोमुराने ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग स्टॉक 214 रुपयांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नोमुरा फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील काळात ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकमध्ये 140 रुपये किमतीच्यावर 56 टक्के अधिक वाढ होऊ शकते. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 140.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नोमुरा फर्मच्या व्हर्चुअल इंडिया कॉर्पोरेट डे दरम्यान, नायका कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितले की, अनावश्यक खर्चात कपात केल्याने कंपनीच्या सौंदर्य आणि पर्सनल केअर विभागाच्या विक्रीवर परिणाम होणार नाही, कारण या प्लॅटफॉर्मवर विकली जाणारी सर्व उत्पादने कमी किमतीबर उपलब्ध आहेत. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
कंपनीच्या व्यवस्थापनाने माहिती दिली आहे की, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन स्टोअर्स मधील कंपनीची उपस्थिती सर्व ग्राहक विभागांना सक्षम करते. कंपनीच्या पूर्तता केंद्रांच्या विस्ताराची प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही व्यवस्थापन मंडळाने सांगितले आहे. यासह कंपनीकडे सध्या सौंदर्य आणि पर्सनल केअर विभागात एकूण 37 पूर्ती केंद्रे उपलब्ध आहेत. फैंशन सेगमेंटबद्दल बोलताना ‘नायका’ कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितले की, ‘नायका’ कंपनी इतर ऑनलाइन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म जसे की, Amazon India, Flipkart, Myntra, Ajio यासारख्या उत्पादने आणि सेवा प्रदान करून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
उपभोग पातळीत घट झाल्यामुळे नायका कंपनीच्या सेल्सवर विशेष परिणाम पाहायला मिळाला नाही. नोमुरा फर्म म्हणते की, भारतात उपभोगाच्या पातळीत घट झाली असून ब्युटी प्रॉडक्टच्या कमी किमती लक्षात घेता उपभोग पातळीत झालेल्या घसरणीचा नायका कंपनीच्या विक्रीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. नोमुरा फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, 2023 ते 2028 या कालावधीत ‘नायका’ कंपनीचे मार्जिन सरासरी वार्षिक 27 टक्के राहू शकते.
ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने ‘नायका’ कंपनीच्या कामगिरी बाबत चिंता व्यक्त केली आहे. मागच्या आठवड्याच्या सुरूवातीला मॅक्वेरीने ‘नायका’ कंपनीच्या कव्हरेजला ‘अंडर परफॉर्म’ रेटिंग दिली होती. ब्रोकरेज फर्म ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकवर प्रति शेअर 115 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्युटी सैगमेंटची वाढ आता मोठ्या शहरांच्या तुलनेत छोटया शहरांमध्ये अधिक दिसून येत आहे, ही बाब कंपनीसाठी अडचणीची ठरू शकते. कारण कंपनीची पोहोच अजूनही लहान शहरांमध्ये खूप कमी आहे. मॅक्वेरी फर्म चे म्हणणे आहे की, रिलायन्स रिटेल आणि टाटा क्लीक सारख्या नवीन खेळाडूच्या प्रवेशामुळे ‘नायका’ कंपनीसाठी स्पर्धा आणखी वाढू शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.