Nykaa Share Price | नायका शेअरमधील तेजी पाहून गुंतवणुकदार हैराण, शेअर अचानक 7.49 टक्के वाढला, फायदा घेणार?

Nykaa Share Price | शुक्रवारी शेअर बाजारातील जबरदस्त चढ-उतारांच्या दरम्यान नायका कंपनीची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्सच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 136.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

नायका शेअरची 52 आठवड्यांची पातळी

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 114.30 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 249.67 रुपये होती. नायका कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39000 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 7.49 टक्के वाढीसह 135.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नायका तज्ञ स्टॉकवर उत्साही

तज्ञ नायका कंपनीच्या स्टॉक बाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने नायका स्टॉकवर 210 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजची स्टॉकवर 186 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. या दोन्ही ब्रोकरेजने गुंतवणूकदारांना शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील एका वर्षात नायका शेअरने दिलेला परतावा

मागील एका वर्षात नायका कंपनीच्या शेअरने लोकांना 44.28 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 9.31 टक्के वाढले आहेत. मागील पाच दिवसात हा स्टॉक 7.83 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यूची किंमत 1125 रुपये होती.

नायका शेअर 2000 रुपयांपेक्षा जास्त दराने शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. मात्र नंतर कंपनीने स्टॉक स्प्लिट केल्याने शेअरची किंमत कमी झाली, आणि स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव देखील वाढला.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price today on 03 June 2023.