
Oriana Power IPO | ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीच्या IPO बाबत शेअर बाजारात जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांमध्ये देखील प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीच्या IPO ला अवघ्या 3 दिवसात 230 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे.
IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बोली लावली आहे. ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 115 ते 118 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. ग्रे मार्केटमध्ये देखील ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीच्या IPO स्टॉकला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
ओरियाना पॉवर IPO सबस्क्रिप्शन :
ओरियाना पॉवर कंपनीचे शेअर्स IPO च्या तिसऱ्या दिवशी 176 पट अधिक सबस्क्राइब झाले आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये गैरसंस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 251 पट अधिक खरेदी झाला आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 204 पट अधिक खरेदी झाला आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीच्या IPO च्या पहिल्या दिवशी 40.58 पट बोली प्राप्त झाली होती.
ओरियाना पॉवर लिमिटेड जीएमपी :
ग्रे मार्केटमध्ये ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 3 ऑगस्ट 2023 रोजी 103 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर हा स्टॉक ग्रे मार्केट किंमत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला तर स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 87.29 टक्के नफा मिळू शकतो. ओरियाना पॉवर लिमिटेड कंपनीचा IPO 1 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि IPO ची अंतिम मुदत 3 ऑगस्ट 2023 रोजी संपली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.