
Oriental Rail Infra Share Price | ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार मुकुल अग्रवाल यांनी देखील ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. ( ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानूसार मुकुल अग्रवाल यांनी कंपनीचे 1 टक्के पेक्षा जास्त शेअर्स धारण केले आहेत, म्हणून त्यांचे नाव कंपनीच्या वैयक्तिक भागधारकांच्या यादीत सामील आहे. आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.08 टक्के वाढीसह 256.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समधे मागील एका वर्षात 550 टक्के वाढ झाली आहे. मात्र अजूनही या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मार्च 2024 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, मुकुल अग्रवाल यांनी ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 34 लाख शेअर्स होल्ड केले आहेत. हे शेअर्स कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या तुलनेत 5.53 टक्के आहे.
ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 38.65 रुपयेवरून वाढून 255 रुपये किमतीच्या पार गेली आहे. मागील एका वर्षात ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 550 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 146 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.