महत्वाच्या बातम्या
-
TCS share price | TCS शेअरची किंमत 6 टक्क्यांनी खाली | गुंतवणूकदारांना खरेदीची संधी?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS share price) च्या शेअरची किंमत आज 11 ऑक्टोबर रोजी सुरुवातीच्या व्यापारात 6 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. 8 ऑक्टोबर रोजी, TCS ने 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत 9,624 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला होता, ज्यामध्ये 14.1 टक्के वाढ झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
Coal Shortage | देशात ऑक्सिजन आपत्तीनंतर 'वीज आपत्तीची' शक्यता | मोदी सरकार राष्ट्रीय कोंडीत
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक असलेल्या देशात सध्या कोळशाचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. यामुळे उत्तर, मध्य आणि ईशान्येकडिल राज्यांत वीज संकट निर्माण (Coal Shortage In India) झाले आहे. २० हून जास्त राज्यांत दीर्घकाळ वीज गूल होत आहे. वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, दिवाळीपर्यंत वीज संकटातून सुटकेची शक्यता कमी आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात कोळसा खाणींवर अनिष्ट परिणाम झाला. तर वीज निर्मिती केंद्रात एकही दिवस वीज उत्पादन बंद नव्हते.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | आज 'महाराष्ट्र बंद' | काय सुरु आणि काय असणार बंद?
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक (Maharashtra Bandh) दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | पुण्यात व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा | दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी (Maharashtra Bandh) आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. व्यापारी महासंघाकडून सोमवारी तशी माहिती देण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | आज काय दराने खरेदी कराल सोनं? | काय आहेत आजचे दर
सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Price Today) गेल्या काही काळापासून चढउतार होत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत. दरम्यान आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर आहेत 46,940 (10 ग्रामसाठी) तर 22 कॅरेटचा दर आहे 45,940 रुपये आहे.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ | महागाईचा भडका उडणार, पैसे मोजत बसा
देशभरात सलग सातव्या दिवशी इंधनाच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात (Petrol Diesel Price) आली आहे. इंडियन ऑईल, HPCL आणि BPCL या भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैसे तर डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत इंधनाची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Semiconductor Crisis in Automotive Industry | तुम्ही सणामध्ये नवीन कार बुक केली आहे? | डिलिव्हरीला उशीर होऊ शकतो
सेमीकंडक्टरच्या संकटादरम्यान वाहन उत्पादक डिलर्सना पुरेशा प्रमाणात पुरवठा करू शकत नाहीत. यामुळे या सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची (Semiconductor Crisis in Automotive Industry) शक्यता आहे. फेडरेशन ऑफ व्हेइकल डीलर्स असोसिएशनचे (एफएडीए) अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “चिपचे संकट सुरूच आहे. अशा परिस्थितीत वाहन उत्पादकांना उत्पादनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
4 वर्षांपूर्वी -
EPFO Alert For Account Holders | तुमचं EPF अकाउंट आहे? | मग ही बातमी वाचा
जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ (EPFO Alert For Account Holders) खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Marathwada Flood | मराठवाड्याला प्रसंगी कर्ज काढून 4 हजार कोटींची नुकसान भरपाई - उपमुख्यमंत्री
अतिवृष्टीने मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टरपैकी ३२ ते ३६ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हिशेब केल्यास नुकसान भरपाईसाठी साधारणत: चार हजार कोटी रुपये लागणार (Marathwada Flood) आहेत. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी कर्ज काढून ही भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे विभागीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.
4 वर्षांपूर्वी -
Amazon Prime Subscription Plan | सर्वाधिक स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन ग्राहकांसाठी रोलआउट | अधिक माहितीसाठी वाचा
जर तुम्ही ॲमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण ॲमेझॉन प्राइमने आपला 129 रुपयांचा आपला सर्वाधिक स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन ग्राहकांसाठी रोलआउट (Amazon Prime) केला आहे. आरबीआयच्या नव्या गाइडलाइन्सनुसार, रिकरिंग ऑनलाईन पेमेंट्ससाठी अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिफिकेशन (AFA) अप्लाय करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे महिन्याभराची प्लॅन सेवा बंद केल्यानंतर लगेच ॲमेझॉनकडे फक्त तीन महिने किंवा वार्षिक सर्विस होती.
4 वर्षांपूर्वी -
Coal Crisis In India | चीन-युरोपनंतर आता भारतात वीज संकट | निम्म्या भारतात वीज गुल होणार?
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक असलेल्या देशात सध्या कोळशाचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. यामुळे उत्तर, मध्य आणि ईशान्येकडिल राज्यांत वीज संकट निर्माण झाले आहे. २० हून जास्त राज्यांत दीर्घकाळ वीज गूल (Coal Crisis In India) होत आहे. वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, दिवाळीपर्यंत वीज संकटातून सुटकेची शक्यता कमी आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात कोळसा खाणींवर अनिष्ट परिणाम झाला.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ | महागाईने तुमचा खर्च वाढणार
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कडाडल्यामुळे भारतात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price) झाली आहे. इंडियन ऑईल, HPCL आणि BPCL या भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैसे तर डिझेलच्या दरात 47 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत इंधनाची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BYJU'S Banned Shahrukh Khan Ads | शाहरुख खानवर आधारित सर्व जाहिराती BYJU'S ने थांबवल्या
ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवर मोठा फटका बसला आहे. ऑनलाइन लर्निंग ॲप BYJU’S (बायजूस) ने शाहरुख खानवर आधारित असलेल्या आपल्या सर्व जाहिराती थांबवण्याचा (BYJU’S Banned Shahrukh Khan Ads) निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर ज्या जाहिरातींचे शाहरुखसोबत बुकिंग झाले होते त्या देखील रिलीज करणार नाही असा निर्णय कंपनीने घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Paytm Navratri Gold Offer | LPG बुकिंगवर मिळवा 10001 रुपयांचे सोने | कसे कराल बुकिंग
एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगवर पेटीएमने ग्राहकांसाठी बंपर ऑफर सुरु केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने ऐन सणासुदीच्या काळात ही ऑफर ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. नवरात्रोत्सव काळात ही ऑफर सादर करण्यात आली आहे. ही ऑफर (Paytm Navratri Gold Offer) एलपीजीच्या तीन कंपन्यांवर उपलब्ध आहे- Indane, HP Gas आणि Bharat Gas. पेटीएम गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर दररोज 10,001 रुपयांचे पेटीएम डिजिटल गोल्ड जिंकण्याची संधी देत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | आज काय दराने खरेदी कराल सोनं? | काय आहेत आजचे दर
सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Price Today) गेल्या काही काळापासून चढउतार होत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत. दरम्यान आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | मुंबईत डिझेलचे शतक | पेट्रोलचे दर सुद्धा गगनाला | सामान्य लोकं हैराण
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल 26 ते 30 पैसे आणि डिझेल 33 ते 37 पैशांनी महागले आहे. मुंबईत पहिल्यांदाच डिझेलने शंभरीचा टप्पा (Petrol Diesel Price) ओलांडला आहे. तर मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले आहे.
4 वर्षांपूर्वी -
MobiKwik IPO | मोबिक्विकच्या IPO'ला सेबीकडून मंजुरी | गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
MobiKwik ला भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड कडून 1,900 कोटी रुपयांच्या आरंभिक सार्वजनिक ऑफरिंग साठी मंजुरी मिळाली. गुरुग्राम स्थित कंपनीने जुलै महिन्यात सेबीकडे IPO साठी कागदपत्रे सादर केली होती. आयपीओमधून 1,900 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा (MobiKwik IPO) मानस आहे. आयपीओंतर्गत 1,500 कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी केले जातील. याशिवाय कंपनीचे विद्यमान भागधारक 400 कोटी रुपयांच्या विक्रीसाठी ऑफर आणतील.
4 वर्षांपूर्वी -
Muhurat Trading on Lakshmi Pujan | दिवाळीतच मिळते ही संधी | मग यंदा करा शेअर बाजारात प्रवेश
दररोज हजारो कोटी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या शेअर बाजाराने अनेक वर्षांपासून आपल्या परंपरा जपल्या आहेत. यातली सर्वांत महत्त्वाची परंपरा म्हणजे दिवाळीच्या दिवशीचं मुहूर्त ट्रेडिंग. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर (Muhurat Trading on Lakshmi Pujan) शेअर बाजारात ट्रेडिंग केलं जातं. गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंगच्या विशेष प्रसंगी नव्या गुंतवणुकीस सुरुवात करतात. मुहूर्त ट्रेडिंग शुभ मानलं जातं.
4 वर्षांपूर्वी -
SBI Gold Deposit Scheme | घरात सोनं आहे पण वापरात नाही? | अशी करा कमाई
अनेकदा घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या वापर केला जात नाही. ते लॉकरमध्ये पडून राहतं, दरम्यान याच सोन्यातून तुम्ही कमाई करू शकता. जर तुम्हाला सोन्यातून कमाई करायची असेल तर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये जमा करू शकता. एसबीआयची रिव्हॅम्पड गोल्ड डिपॉझिट योजना म्हणजेच आर-जीडीएस (SBI Gold Deposit Scheme) मुदत ठेवीप्रमाणे काम करते. या योजनेअंतर्गत ग्राहक त्यांचे सोने जमा करू शकतात आणि व्याजाच्या स्वरूपात रक्कम मिळवू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
EPF Money Withdrawal | EPF नियमात बदल | घरबसल्या तासाभरात १ लाख रुपये काढू शकता - पहा प्रोसेस
सामान्य लोकांच्या पैशांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने भविष्य निधीबाबत नवीन सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत आता तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 1 लाख रुपये अँडव्हॉन्स काढू (EPF Money Withdrawal) शकता. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन काळात तुम्ही हे पैसे काढू शकता. तसेच या अँडव्हॉन्स पैशांसाठी अर्ज केल्यानंतर, बँक खात्यात पैसे हस्तांतरण करण्याची वेळ (डीबीटी) देखील कमी केली गेली आहे. यासाठी सरकारने नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL