18 February 2025 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RELIANCE GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, जीटीएल कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये Horoscope Today | मंगळवार 18 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा मंगळवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, 22 फेब्रुवारीपासून या 3 राशींसाठी चांगला काळ सुरु होणार, तुमची राशी आहे का?
x

Paras Defence Share Price | या डिफेन्स कंपनीचा शेअर तेजीने धावणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली

Paras Defence Share Price

Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या स्टॉकने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 305 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीची सहयोगी कंपनी कॉन्ट्रोप-पारस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला लार्सन अँड टुब्रो कंपनीकडून ही ऑर्डर मिळाली आहे. ( पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

2024 या वर्षात पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी स्टॉक 60 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13.40 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1,208.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

पारस डिफेन्स कंपनीने माहिती दिली की, त्यांची सहयोगी कंपनी कॉन्ट्रोप-पारस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला लार्सन अँड टुब्रो लिमिटेडकडून 305 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला Sight-25 HD इलेक्ट्रो-ऑप्टिक्सच्या 244 युनिट्सचे उत्पादन आणि पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह कंपनीला एक्सटेंडेड वारंटी चार्जर आणि इंटीग्रेटेड लॉजिस्टिक्स सपोर्ट पॅकेज देखील पुरवायचे आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीला 47 महीन्याची मुदत देण्यात आली आहे.

जून 2024 तिमाहीत पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचा निव्वळ नफा 147 टक्क्यांच्या वाढीसह 14.9 रुपये नोंदवला गेला आहे. या काळात कंपनीचा महसूल 73 टक्क्यांनी वाढून 83.6 टक्के नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचा निव्वळ नफा आणि महसूल अनुक्रमे 6 कोटी आणि 48.3 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

पारस डिफेन्स ही खाजगी क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः संरक्षण आणि अंतराळ अभियांत्रिकीशी संबंधित उत्पादने आणि उपायांच्या निर्मितीचा व्यवसाय करते. ही कंपनी डिफेन्स अँड स्पेस ऑप्टिक्स, डिफेन्स उत्पादन यावर लक्ष केंद्रित करते. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी ही कंपनी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स, हेवी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, पल्स प्रोटेक्शन सोल्यूशन्स या क्षेत्रावर विशेष लक्ष देते.

News Title | Paras Defence Share Price NSE Live 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Paras Defence Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x