15 December 2024 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Patel Engineering Share Price | होय! फक्त 7 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत दिला 600% परतावा, दिग्गजांकडून शेअर्सची खरेदी

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग या पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून 98 टक्के घसरल्यानंतर पुन्हा तेजीत आले. आता पटेल इंजिनीअरिंग स्टॉक 7 रुपयेवरून वाढून 50 रुपये किमतीवर पोहोचला आहे.

या काळात पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 600 टक्के नफा कमावला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 1 कोटीपेक्षा जास्त शेअर्स आहेत. सध्या शेअर 0.67% घसरून 51.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.

11 जानेवारी 2008 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 656.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 ऑगस्ट 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.20 रुपये किमतीपर्यंत घसरले होते. पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 98 टक्के घसरण झाली होती.

22 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 52.02 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 30 ऑगस्ट 2019 पासून आतापर्यंत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 623 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.11 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.10 रुपये होती.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे 13000000 शेअर्स आहेत. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.68 टक्के आहे. 2023 या वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 195 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 17.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 52.02 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 97 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE 23 November 2023.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x