29 February 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 01 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, याआधी 1 वर्षात 200% परतावा दिला, नेमकं कारण काय? Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, अल्पावधीत वाढेल गुंतवणुकीचा पैसा Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! हे टॉप 3 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
x

Patel Engineering Share Price | शेअरची किंमत 69 रुपये! पटेल इंजिनिअरिंग शेअर्समधून करोडोमध्ये कमाई होतेय

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली सुरू आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांची गुंतवणूक असलेल्या पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 71.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू आहे. विजय केडिया यांनी पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे 1.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 1.3 कोटी शेअर्स असून त्यांची एकूण होल्डिंग व्हॅल्यू 93 कोटी रुपये आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5270 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 3.14 टक्के घसरणीसह 69.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 3.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12.37 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 398 टक्के वाढवले आहे. विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 1.3 कोटी शेअर्स आहेत. मागील एका वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने विजय केडिया यांना अल्प गुंतवणुकीवर 74.26 कोटी रुपये नफा कमावून दिला आहे.

30 ऑगस्ट 2019 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 7.20 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 23 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर 51.40 रुपये किमतीवर पोहचले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जर या कंपनीचे शेअर्स 75 रुपये किमतीच्या पार गेले तर हा स्टॉक अल्पावधीत 174 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. म्हणून गुंतवणूक करताना तज्ञांनी 55 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 12 February 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x