
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या स्टॉकने मागील 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स अल्पावधीत जबरदस्त वाढले आहेत. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 13 रुपयेवरून वाढून 43 रुपयेवर पोहचली आहे.
पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 13 जुलै रोजी 5 टक्के वाढीसह 43.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 45.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
28 मार्च 2023 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 13.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 43.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 215 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 28 मार्च 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.14 लाख रुपये झाले असते.
दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे आणखी 30 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. विजय केडिया यांनी जून 2023 च्या तिमाहीत पटेल इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आणखी गुंतवणूक करून 30 लाख शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. विजय केडिया यांनी सध्या पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 1.30 कोटी शेअर्स धारण केले आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत विजय केडिया यांनी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 1 कोटी शेअर्स धारण केले होते. तर कंपनीच्या प्रवर्तकांकडे एकूण 39.41 टक्के भाग भांडवल आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.