
Patel Engineering Share Price Today | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज गुरूवार दिनाक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 17.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांनी देखील आल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक होल्ड केला आहे. (Patel Engineering Limited)
विजय केडिया यांनी ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीचे 1 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. ‘विजय केडिया सिक्युरिटीज’ या फर्मचे नाव ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीच्या शेअर धारकांच्या यादीत सामील झाले आहे. विजय केडिया सिक्युरिटीज फर्मचे संपूर्ण मालकी हक्क असलेले प्रवर्तक विजय केडिया आहेत.
केडिया सिक्युरिटीज फर्मने मार्च 2023 च्या तिमाहीत ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीचे 1 कोटी शेअर्स म्हणजेच कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.29 टक्के वाटा खरेदी केला आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील पाच दिवसांत ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 20.41 टक्के वाढले आहेत. तर गेल्या सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 10.79 टक्के कमजोर झाले आहेत. विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये 16 कंपन्याचे सामील आहेत. विजय किशनलाल केडिया यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य 729.42 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.