14 December 2024 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Paytm Instant Loan Scheme | तुम्हाला पेटीएम'वर घरबसल्या काही मिनिटांत 2 लाखांचं कर्ज मिळेल, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Paytm Instant Loan Scheme

Paytm Instant Loan Scheme | गरज पडल्यास हजार पाचशे नव्हे, तर दोन लाख रुपयांपर्यंतची व्यवस्था करू शकणारे पाकीट तुम्ही पाहिले किंवा ऐकले आहे का? येथे आम्ही खिशात ठेवलेल्या वॉलेटबद्दल बोलत नसून स्मार्ट फोनच्या आत असलेल्या ई-वॉलेटबद्दल बोलत आहोत, ज्याचा कोणताही वापरकर्ता फायदा घेऊ शकतो. खरंतर पेटीएम वॉलेट युजर्ससाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. विजय शेखर शर्मा यांच्या मालकीची पेटीएम आता आपल्या युजर्संना 5 मिनिटांपेक्षा कमी किंवा फक्त 2 मिनिटांमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचे इन्स्टंट लोन घेण्याची संधी देत आहे.

पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया :
कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते पैसे आपल्या खात्यापर्यंत पोहोचेपर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने हे कर्ज पूर्णपणे डिजिटली उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत बँकेत जाऊन कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. अलिकडेच कंपनीने इन्स्टंट पर्सनल लोन सर्व्हिस सुरू केली असून, त्याचा फायदा कमी पगाराचे कर्मचारी, छोटे व्यावसायिक आणि व्यावसायिकांनाही होणार आहे.

अशा प्रकारे घरबसल्या मिळेल कर्ज :
या योजनेत पेटीएम युजर्संना घरबसल्या मोबाईलवरून कर्जासाठी अर्ज करता येईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या खात्यात दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम येईल. इन्स्टंट पर्सनल लोन घेण्यासाठी ग्राहकांना पेटीएम अॅपवर जाऊन फायनान्शिअल सर्व्हिसेस ऑप्शनमधील ‘पर्सनल लोन’ टॅबवर क्लिक करून अर्ज करावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला मागितलेली माहिती द्यावी लागेल, त्यानंतर तुमची पात्रता पाहिली जाईल आणि त्यानंतर पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतील.

3 वर्षात भरणार रक्कम :
पेटीएमने आतापर्यंत शेकडो ग्राहकांना पर्सनल लोन दिले आहे. या योजनेच्या उद्दिष्टाबद्दल बोलायचे झाले तर कंपनी वर्षाच्या अखेरीस सुमारे 10 लाख लोकांना पर्सनल लोन देणार आहे. पेटीएमलाही या योजनेच्या माध्यमातून आपला युजर बेस वाढवायचा आहे. याअंतर्गत पर्सनल लोन घेणाऱ्यांना 18 ते 36 महिन्यात कर्जाची रक्कम फेडावी लागणार आहे. पेटीएमने नवीनतम कर्ज सेवेसाठी अनेक बँका आणि एनबीएफसीशी भागीदारी केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Paytm Instant Loan Scheme application online process check details 24 August 2022.

हॅशटॅग्स

#Paytm Instant Loan Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x